संस्कृती, संदर्भ, भावना व्युह
बालवयात पेलत नव्हती
तरी तिने सावरली नववारी,
तो कुठे होता?
शर्ट पॅन्ट घालून बसला
होता खुर्चीवर
पूजेसाठी गोळा केली
तिने फुले आणि पत्री,
तो कुठे होता?
ह्यात मला नाही वेळ
म्हणून निघून गेला होता,
पतीच्या आरोग्यासाठी, आयुष्यासाठी
ती करत होती व्रत आणि पूजा
तो कुठे होता?
मित्रांच्या घोळक्यात
विडी, सिगारेट ओढत होता...
त्याच्या आई वडिलांचे
आल्यागेल्याचे सारे ती करते,
तो कुठे होता?
तिच्या माहेरी जरूरी असल्यावरदेखील
तू जायचे नाही सांगत होता....
अशा वागण्याला आपली
संस्कृती म्हणण्याचा
संदर्भच तिला लागेना
भावनाव्युहातून सुटका होईना!
अर्चना कुलकर्णी.
9/7/2024
No comments:
Post a Comment