माणूस व प्राणी
शाम ला आई वडिलांनी खूप लाडात वाढवले, नेहमी तो म्हणेल ते देत गेले. पण लग्नानंतर तो बदलला आई वडिलांशी नीट वागेना , घरी पैसे देत नसे, शेवटी आई बाबांनी त्याला वेगळे राहण्यास सांगितले , तो ही आपल्याला काही वस्तू हव्यात असे म्हणून घरातून कित्येक वस्तू घेऊन बाहेर पडला.
वर्षभरात बाबा आजारी झाले, त्याला बोलावून देखील तो आला नाही. उलट आता माझी गरज का? असे म्हणून बघत राहिला.सुदैवाने बाबांची पेन्शन होती, त्यामुळे योग्य उपचार मिळून ते बरे झाले.
सकाळीच आमच्या समोर च्या सोसायटी मधील काका आपल्या गावठी कुत्र्याला घेऊन बाहेर पडले.रस्त्यावर कडेला घेऊन त्याच्या मानेचा पट्टा काढला , म्हणाले जा आता तू. तो लाल्या त्यांच्याजवळ च पायापाशी घोटाळत उभा राहिला...
नाईलाजाने काकांनी दगड उचलला व हाड हाड लाल्या करत त्याच्यावर भिरकावला.
पाळलेला कुत्रा त्याला का बरे हाकलले असावे असा मी विचार करत होते. तितक्यात काकांनी दुसरीकडे तोंड फिरवून जायला सुरुवात केली व एका मोठ्या दगडाला अडखळून पडले, दुसरे कोणी त्यांना उठवायला येण्याच्या आता लाल्या चपळपणे आला, व त्यांचे सर्व अंग चाटू लागला, ते हि त्याच्या गळयात हात टाकून रडू लागले,
माणसातला इगो माणसा माणसात दुरावा निर्माण करतो आहे का ?
अर्चना कुलकर्णी
2/4/17

No comments:
Post a Comment